सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढलं!! अजितदादांनी केली मोठी घोषणा

डिजिटल पुणे    20-01-2025 16:47:05

जालना : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे . त्यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजना ही गरजवंत महिलांसाठी असलेली एक सामाजिक योजना आहे. आता या योजनेचा लाभ त्याच महिलांना मिळणार ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे. ज्यांचे उत्पन्न त्यापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढल आहे. तर चला अजितदादांनी केलेल्या मोठ्या घोषणेबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

अजितदादांची मोठी घोषणा

अजित पवार  म्हणाले, “लाडकी बहीण योजना सुरू करताना, राज्य शासनाने केवळ गरजवंत महिलांसाठी ही योजना आखली होती. पण काही महिला इनकम टॅक्स भरत असूनही या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे, आता फक्त अडीच लाख रुपये पर्यंत उत्पन्न असणाऱ्या गरजवंत महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना मिळतील.”

योजनेसाठी 3 हजार 700 कोटींचा चेक –

अनेक विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले होते कि , सत्ता आल्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत. पण अजितदादा  म्हणाले कि आम्ही दिलेले वचन पूर्ण करणार आहोत. यासाठी मोठे पाऊल म्हणून लाडक्या बहिणी योजनेसाठी  3 हजार 700 कोटींचा चेक महिला व बाल कल्याण विभागाला दिला आहे. त्यामुळे हे पैसे लाडक्या बहिणींना दर महिन्याला मिळत राहतील. तसेच या योजनेचे पैसे 26 जानेवारीपर्यंत लाभार्थींच्या खात्यावर जमा होतील. ज्यांचे उत्पन्न महिना 20 ते 21 हजारापेक्षा अधिक आहे, त्या महिलांनी स्वतहून या योजनेच्या लाभाची गरज नाही, असे जाहीर केले पाहिजे . यामुळे सरकारला मोठी मदत मिळणार आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती