सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 राज्य

राष्ट्रीय स्कूल बँड स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत महाराष्ट्रातील दोन शाळा

डिजिटल पुणे    22-01-2025 11:34:58

नवी दिल्ली :  प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2024-25 ची महाअंतिम फेरी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील दोन शाळा महाअंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी आयोजित केली जाते. या स्पर्धेत 16 शाळा बँड संघ निवडले गेले आहेत. त्यात बॉयज ब्रास बँड, गर्ल्स ब्रास बँड, बॉयज पाईप बँड, गर्ल्स पाईप बँड असे असून,  466 मुले महाअंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.

महाअंतिम फेरीसाठी महाराष्ट्रातील राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्टस् अकॅडमी, इस्लामपूर (पश्चिम झोन) आणि भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्स, नाशिक (पश्चिम झोन) या दोन शाळांची निवड झाली आहे.

 

सशस्त्र दलांचे वरिष्ठ अधिकारी परिक्षक असून हे परिक्षक मंडळ स्पर्धतील बँड चमुच्या कामगिरीचे मूल्यमापन करतील. विजेत्यांना 25 जानेवारी 2025 रोजी सरंक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.

प्रत्येक गटातील अव्वल तीन संघांना रोख पारितोषिक (प्रथम – रु. 21,000/-, द्वितीय – रु. 16,000/- आणि तृतीय – रु. 11,000/-), चषक तसेच प्रमाणपत्रे दिली जातील. प्रत्येक गटातील उर्वरित संघाला प्रत्येकी 3,000/- चे प्रोत्साहनपर रोख पारितोषिक दिले जाईल.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती