मुंबई : दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांनी उद्योग व्यवसायात दिलेलं अमूल योगदान संपूर्ण जगाने मान्य केलं आहे. त्यांचं नुकताच निधन झालं. त्याच्याशी संबंधित अनेक बातम्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. मात्र आता बातमी आहे ती, त्याचा छोटा मित्र शंतनू नायडूची. शंतनू नायडू यांना टाटा मोटर्समध्ये नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर बनवण्यात आले आहे. त्यांना टाटा मोटर्सच्या जनरल मॅनेजर आणि स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हजचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
शंतनू भावनिक का झाला?
शंतनू नायडू यांनी लिंक्डइनवर एक भावनिक नोट लिहून ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की मी टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर, हेड-स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज म्हणून नवीन पद स्वीकारत आहे! मला आठवते जेव्हा माझे पालक रतन टाटा मोटर्स प्लांटमधून पांढरा शर्ट आणि नेव्ही ब्लू घालून परतायचे आणि मी खिडकीत त्याची वाट पहात असे.”
गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा यांनी दोन दशकांहून अधिक काळ टाटा समूहाचे नेतृत्व केले. शंतनू नायडू हे त्यांच्या खूप जवळचे मानले जात होते. ते रतन टाटा यांचे वैयक्तिक सहाय्यक होते. टाटा देखील शंतनूला आपल्या मुलासारखे मानत असत. शंतनू रतन टाटा यांना त्यांच्या व्यवसायात पूर्णपणे मदत करायचे. शंतनू रतन टाटा यांच्या शेवटच्या काळातही त्यांच्यासोबत होते.
शंतनूचं टाटांशी खास नातं
शंतनूने पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाचे नाव आहे ‘I came upon a Lighthouse’ या पुस्तकात शंतनूने सांगितले आहे की, रस्ते अपघातात कुत्रे मरताना पाहिल्यानंतर त्याने कुत्र्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर घालायला सुरुवात केली. रतन टाटा हे पाहून खूप प्रभावित झाले. यानंतर रतन टाटा यांनी त्यांना आपले सहाय्यक बनवले. यानंतर, २०१८ मध्ये, शंतनू रतन टाटांचे सहाय्यक बनले.