सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

राज्यपालांच्या हस्ते नवभारत कॉर्पोरेट सामायिक दायित्व पुरस्कार प्रदान

डिजिटल पुणे    05-02-2025 15:26:04

मुंबई : नवभारत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित चौथे नवभारत नवराष्ट्र कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आले.आपल्या सामाजिक दायित्व निधीतून आरोग्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते कॉर्पोरेट समूह, सार्वजनिक उपक्रम, उद्योग, सामाजिक संस्था व समाजसेवी व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नवभारत- नवराष्ट्र तेजोत्सव या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाला नवभारतचे व्यवस्थापकीय संपादक निमिष माहेश्वरी, मेघाश्रेय फाउंडेशनच्या संस्थापिका सीमा सिंह, अध्यक्ष, बजाज फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर बजाज तसेच निमंत्रित उपस्थित होते.

यावेळी जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षवर्धन नवाथे, सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या संचालिका सारा तेंडुलकर, पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांसह एल अँड टी,  टाटा मोटर्स, एसबीआय फाउंडेशन, डॉ डी  वाय पाटील  शिक्षण समूह, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, रायन इंटरनॅशनल, ग्रांट मेडिकल फाउंडेशन आदी संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती