सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • केंद्रीय मंत्री अमित शहा आज पुणे दौर्यावर
 पूर्ण तपशील

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मामा भाच्याच्या जोडीला अटक; मुंबई एटीएसची कारवाई

डिजिटल पुणे    21-02-2025 12:53:57

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोन आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून मुंबई एटीएसने कारवाई करत ताब्यात घेतलं असून ते मुंबईकडे निघाले आहे. मंगेश वायाळ व अभय शिंगणे असं या आरोपीचे नाव आहे. मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचं देऊळगाव येथे मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे. हे दोघेही संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेची संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांनाही दारूचे व्यसन असून या दोघांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही नात्याने मामा आणि भाचे आहेत. मंगेश हा नात्याने अभयचा मामा आहे. रात्री दोन वाजता मुंबई एटीएसने कारवाई करत देऊळगाव येथून या दोघांना ताब्यात घेतल आहे.

एकनाथ शिंदे गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर होते. रामलीला मैदानावर झालेल्या रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी एनडीए नेत्यांसोबत बैठक घेतली. रेखा गुप्ता यांनी गुरुवारी दिल्लीत नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला.

धमकीचा उद्देश अद्याप अस्पष्ट, तपास सुरू

पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या दोघांकडून सध्या तपास यंत्रणा या दोघांनी एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी का दिली याचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना नेमक्या कोणत्या कारणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून हा ईमेल पाठवला, याचा शोध घेतला जात आहे. याबाबतचा तपास सुरु आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यासंदर्भात गोरेगाव पोलिस ठाण्यात धमकीचा ईमेल करण्यात आला आहे. शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख यामध्ये होता. त्यामुळे आता पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू झाला. या प्रकरणात आता कारवाई करण्यात आली असून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती