सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • केंद्रीय मंत्री अमित शहा आज पुणे दौर्यावर
 जिल्हा

कर्नाटकमधील चित्रदुर्गामध्ये महाराष्ट्राच्या एसटी चालकावर कन्नडीगांचा हल्ला; कोल्हापुरात शिवसेनेचा तीव्र निषेध

अजिंक्य स्वामी    22-02-2025 12:50:19

चित्रदुर्ग/कोल्हापूर : कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या चालकावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून चेहऱ्याला काळे फासण्याचा प्रकार घडला आहे. महाराष्ट्र महामंडळाच्या बसवर कर्नाटकमध्ये सेवा बजावणाऱ्या  एसटी चालकाला कन्नड येत नसल्याचे कारण पुढे करून हा हल्ला करण्यात आला असल्याचे समजते. या घटनेचा निषेध करत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने कोल्हापुरात तीव्र आंदोलन केले. या प्रकारामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे.

चित्रदुर्ग येथे प्रवासी सेवा देत असताना महाराष्ट्र एसटी चालकावर काही कार्यकर्त्यांनी हल्ला करत मारहाण केली. ही घटना समजताच महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनेमुळे सीमावर्ती भागात तणाव वाढला असून, दोन्ही राज्यांच्या सरकारांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून कर्नाटक सरकारकडे आपला निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र एसटी संघटनेनेही या घटनेबाबत संताप व्यक्त केला असून, एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.


 लोकांच्या प्रतिक्रिया

Digital Pune
Ritesh Vilas damane
 22-02-2025 13:14:41

डायवर

 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती