सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • केंद्रीय मंत्री अमित शहा आज पुणे दौर्यावर
 पूर्ण तपशील

पुण्यात शिवशाहीमध्ये तरुणीवर अत्याचार, पोलिसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'ती आरोपीसोबत गेली, तेव्हा...

डिजिटल पुणे    26-02-2025 16:39:09

पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पहाटे साडेपाच वाजता संबंधित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती. यावेळी नराधम आरोपीनं फलटणची बस दुसरीकडे लागते, असं सांगून तिला आडबाजुला नेलं. तेथील एका शिवशाही बसमध्ये बसायला लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

पुण्याच्या मध्यवर्ती असलेल्या स्वारगेट बस स्थानकावर २४ तास लोकांची वर्दळ असते. रात्रभर इथं गाड्या ये जा करत असतात. अशा गजबजलेल्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार झाल्याने पुणे शहर हादरलं आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा आजुबाजुला लोकांची वर्दळ होती. मुलीनं आरडाओरडा केला असता तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. यावेळी त्यांनी बसस्थानकावर नक्की काय घडलं, याची सविस्तर माहिती देखील दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, ‘ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी तपासलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आजुबाजूला भरपूर लोक दिसत आहेत. स्टँडमध्येही काही लोक बसल्याचं दिसत आहेत. ती बसमधून उतरल्यानंतर शेजारच्या बसमध्ये एक ड्रायव्हर चढताना दिसत आहेत. लोकांचा वावर हा तिथे होता. ज्यावेळी आरोपी पीडित तरुणीशी बोलत होता. तेव्हा तिथे अन्य एक व्यक्ती देखील बसली होती. ज्यावेळी मुलगी आरोपीसोबत गेली, त्यावेळी आजुबाजूला काही लोक दिसत आहेत.

आरोपी बसमधून खाली उतरल्यानंतर दोन मिनिटांनी मुलगीही खाली उतरली. तिने आरडाओरडा न करता तिथून निघून गेली. ती बसने निम्म्या रस्त्यात गेली होती. यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या मित्राला फोनवरून सांगितला. ही बाब मित्राला समजल्यानंतर त्याने तक्रार करायला लावली. त्यानंतर नऊच्या आसपास मुलगी तक्रार द्यायला आली. घडलेल्या या प्रकारामुळे तिला धक्का बसला असावा, त्यामुळे त्यावेळी काय करावं हे तिला सुचलं नसावं. त्यामुळे ती उशिरा आली. पण तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही तातडीने तपासाची चक्र फिरवली. आम्ही तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याचं नाव दत्तात्रय रामदास गाडे असून तो शिरूर येथील रहिवासी आहे. त्याच्यावर ३९२ सारखे शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती