सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात अघोषित पाणीकपात,विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत
 जिल्हा

सोलापूरच्या समान पाणी वितरणासाठी आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    08-03-2025 14:52:46

मुंबई  : सोलापूर शहरासाठीचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन जलवितरण प्रणाली आणि वाढीव जलसाठवण क्षमता निर्मितीसाठीचा प्रकल्प टप्पा २ तातडीने पूर्ण करण्यासाठीच्या कार्यवाहीस गती द्यावी. तसेच सोलापूरवासियांना समसमान पाणी वितरणासाठीचा आराखडा तयार करून ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना संदर्भात विधानभवन येथे बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना तातडीने पाणी मिळावे, यासाठी कार्यवाही करण्यासंदर्भात निर्देश दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहरास होणारा अपुरा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि समसमान पाणी वितरण प्रणाली राबविण्यासाठी आराखडा तयार करावा. नवीन उच्चस्तरीय जलकुंभ पहिल्या टप्प्यात व १३ नवीन उच्चस्तरीय जलकुंभ बांधणे तसेच नवीन जलवाहिन्या, मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन आणि वाढीव पंपिंग क्षमता उभारण्यासाठी कार्यवाही करावी. तसेच पाकणी येथे ६६ द.ल.ली. क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याच्या प्रकल्प कामातील भू-संपादनाची प्रक्रिया जलदगतीने करावी जेणेकरून समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव डॉ. के.एच.गोविंदराज, नियोजन विभागाचे अपर मुख्य डॉ. राजगोपाल देवरा, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, नगरपरिषदेचे आयुक्त मनोज रानडे उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती