उरण : इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक राजू ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इतकरे, नितीन पाटील, ए. पी. आय. सतीश गोरे यांनी उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमात विशेषतः रुग्णालयातील सफाई कामगार मोनिका जाधव, प्रियांका मसे, रासिका पाटील आणि वस्त्र धुलाई कर्मचारी रजनी काटे यांचा सन्मान करण्यात आला.
त्यांच्या कमी पगारामुळे आणि अनेकदा तीन-तीन महिने वेतन न मिळाल्यामुळे त्यांना गिफ्ट, रोपटं आणि आर्थिक मदत देऊन त्यांच्या कष्टाची दखल घेण्यात आली.विशेष म्हणजे त्या महिलांना मंचावर प्रमुख अतिथींसोबत मानाचे स्थान देण्यात आले, आणि आपल्या भाषणात त्यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक आभार मानले.तसेच इतर सर्व महिलांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यात आली. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. एम. कालेल आणि संपूर्ण कर्मचारी वृंद कार्यक्रमासाठी उपस्थित होते.या उपक्रमातून महिलांच्या कष्टाला आदर देत, त्यांच्या सशक्तीकरणाचा आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात आला.