सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 शहर

नदीपात्रालगत वारजे परिसरातील गोठ्यात बांधलेली १४ जनावरे नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बुडून दगावली!

डिजिटल पुणे    25-07-2024 17:17:30

पुणे : पुण्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये पानी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणांच्या साखळी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सूर असल्याने खडकवासला धरणातून रात्रीतून अचानक पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकून पडले होते. दरम्यान, पुण्यातील वारजे भागात अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा नदीला आलेल्या पुरामुळे एक दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

रात्री अचानक पाऊस सुरू झाला. खडकवासला धरणातूनही जवळजवळ४० हजार क्युसेक्सने मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे  नदीपात्रातील पाणी वाढले. दरम्यान, वारजे येथील स्मशानभूमीजवळ एका आश्रयाला बांधलेल्या १४ गोवंशांचा मृत्यू झाला. रात्री अचानक आलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून जनावरे बुडाली. १४ पैकी ११ गायी होत्या. पाण्यात तोंड करून उभे राहून काही जनावरे वाचली आहेत. सिंहगड भागातून ७० नागरिकांना बोटीद्वारे रेस्क्यू करण्यात आले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती