सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 शहर

'विरोधाभासाची संस्कृती' पुस्तकावर रविवारी चर्चा; युवक क्रांती दल,महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजन

डिजिटल पुणे    27-07-2024 13:36:58

पुणे:  'विरोधाभासाची संस्कृती' या पुस्तकावर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे ग्रंथालय आणि युवक क्रांती दल यांच्यातर्फे चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या कन्या लेखिका उपिंदर सिंग यांनी हे पुस्तक लिहिले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.देवकुमार अहिरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.रविवार,दि.२८ जुलै रोजी गांधीभवन(कोथरूड) येथे सायंकाळी ४ ते ६ या वेळात हा कार्यक्रम होणार आहे.

'किताबे  कुछ कहती है' या उपक्रमांतर्गत ही चर्चा आयोजित करण्यात आली आहे.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष तसेच युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ.कुमार सप्तर्षी हे या उपक्रमाचे निमंत्रक असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ.शशिकला राय या समन्वयक आहेत.या चर्चेला उपस्थित राहण्याचे आवाहन अन्वर राजन,जांबुवंत मनोहर,अप्पा अनारसे,एड.स्वप्नील तोंडे,कैलास यादव,रोहन गायकवाड,तेजस भालेराव,मुस्कान नदाफ,शीतल करांडे यांनी केले आहे.  

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती