सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 शहर

मोहोळ महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्माण कार्यशाळेचे आयोजन

डिजिटल पुणे    06-09-2024 17:27:53

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात सांस्कृतिक व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्माण" कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉ शर्मिला चौधरी, उप प्राचार्य मेघना भोसले, डॉ.सुनीता डाकले, प्रसिद्ध मूर्तिकार गणेश कापसे उपस्थित होते.सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रूपाली शेंडकर यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करता येऊ शकतो याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 
यावेळी गणेश कापसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नवनिर्मिती, सृजनशीलता याचा आनंद घ्या मनापासून माती काम करा उत्तम प्रतिकृती निर्माण करते असा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनामध्ये  निर्माण केला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद देऊन विविध गणेश मूर्ती तयार केल्या.या कार्यशाळेचे संयोजन प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक प्रमुख डॉ.रुपाली शेंडकर, प्रा.लक्ष्मण उकिर्डे,  राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ अशोक शेळके, डॉ.श्रीनिवास इपलपल्ली, प्रा.स्नेहा हिंगमिरे, ग्रीन क्लब प्रमुख प्रा.सीमा कांबळे, प्रा.मोहिनी कुंभार, प्रा.शितल गायकवाड, विनोद रणपिसे यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपला उस्फूर्त  सहभाग नोंदवला. डॉ. स्वाती शिंदे यांनी सूत्रंचलन केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती