सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 शहर

'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफथेल्मोलॉजी' चे ३१ व्या वर्षात पदार्पण

डिजिटल पुणे    07-09-2024 14:44:50

पुणे: ''नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफथेल्मोलॉजी' या सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालयाने  ३१ व्या वर्षात पदार्पण केले आहे.'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफथेल्मोलॉजी' चे उद्घाटन १९९३ साली डॉ.पी.एन.नागपाल,तत्कालीन मंत्री पुष्पाताई हिरे,डॉ.बानू कोयाजी,अण्णा जोशी आणि भारत सावंत यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर शिवाजीनगर येथील संस्थेच्या भव्य वास्तूमध्ये लाखो रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले आहेत.


'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफथेल्मोलॉजी' हेनॅशनल एक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर' आणि जेसीआय मान्यताप्राप्त पुण्यातील पहिले नेत्र रुग्णालय आहे.डॉ. श्रीकांत केळकर आणि सौ.अरुणा केळकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने अत्याधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षित,अनुभवी कर्मचाऱ्यांची एक तज्ञ टीम एकत्र आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.२० हून अधिक नेत्रतज्ञ आणि ७० हून अधिक नर्सिंग,पॅरामेडिकल आणि प्रशासनिक कर्मचारी कार्यरत आहेत.दशकानुदशके उच्च दर्जाचे मानदंड राखून 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफथेल्मोलॉजी' हे पुणे व परिसरातील रुग्णांसाठी नेत्रउपचारासाठी सर्वोत्तम पर्याय बनले आहे.

येथे विशेष क्लिनिक,पूर्णपणे एकत्रित निदान,इमेजिंग आणि लेसर प्रणाली,अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर,डेकेअर रेकव्हरी सूट्स आणि अत्याधुनिक प्रशिक्षण व शिक्षण सुविधा समाविष्ट आहेत.

डॉ.श्रीकांत केळकर यांनी सांगितले की, संस्थेने नेत्र शस्त्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक साधने व तंत्रज्ञान आणण्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे.१० हजार  पेक्षा जास्त रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा लाभ मिळाला आहे.डॉ.केळकर यांनी संस्थेच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर,नर्स आणि इतर कर्मचार्‍यांच्या समर्पित टीमचे आभार मानले.तसेच,डॉ. केळकर यांनी हॉस्पिटल प्रशासन सांभाळणाऱ्या सौ.अरुणा केळकर आणि डॉ.आदित्य केळकर व डॉ.जाई केळकर यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, ज्यांनी संस्थेच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती