सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 शहर

पुण्यातील शनिवार वाडा येथे रोट्रॅक्ट क्लब केले विविध कार्यक्रमांचे आयोजन

डिजिटल पुणे    07-09-2024 17:40:00

पुणे : पुणे शनिवारवाडा रोट्रॅक्ट क्लब  ने Rotarian. Rotaractor. अथर्व देवधर यांची अध्यक्षपदी, व  Rotaractor त्रुनाल चव्हाण यांची सचिवपदी आणि रोटरी इंटरनॅशनल वर्ष २०२४-२५ साठी त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची स्थापना समारंभ आयोजित केला.

 या समारंभाचा थीम 'रॉयल महाराष्ट्र' असा होता, जिथे सर्वांनी पारंपारिक महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केले होते. या कार्यक्रमाला माजी अध्यक्ष Rotaractor अमेय महस्के, जिल्हा Rotaract प्रतिनिधी दृष्टि सिंग आणि जिल्हा Rotaract प्रतिनिधी निवडक द्विजेश नाशिककर यांची उपस्थिती होती, तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे   शनिवारवाडाचे अध्यक्ष शंतनू जोशी देखील उपस्थित होते. 

२००+ लोकांच्या उपस्थितीत हा समारंभ महाराष्ट्रीयन पद्धतीने तुतारी, ढोल, ताशा आणि क्लबच्या नवीन टीमच्या ऊर्जा यांसह पार पडला. अध्यक्ष अथर्व यांचा वर्षभराचा विषय “तत्परिवर्तनं भाव” म्हणजेच “बदल बना” हा क्लबने उत्कृष्टरीत्या साकारला आहे. जिल्हा ३१३१च्या इतिहासातले सर्वात मोठे इन्स्टॉलेशन समारंभ आयोजित करून, क्लबने बदलाच्या भावनेला प्रत्यक्षात आणले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती