सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 शहर

सीओईपी अभिमान पुरस्कार वितरण कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

डिजिटल पुणे    16-09-2024 15:12:29

पुणे : सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थ्यांचा "सीओईपी अभिमान पुरस्कार" वितरण कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यंदा सीओईपी जीवनगौरव पुरस्कार अहमदाबाद येथील ज्येष्ठ उद्योजक पी. एन. भगवती यांना देण्यात आला. भगवती यांच्या वतीने त्यांच्या सहकार्यांनी पुरस्कार स्वीकारला. राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव प्रवीण दराडे, सिक्कीमचे कॅबिनेट मंत्री राजू बसनेत , अमेरिकेतील जे. पी. मॉर्गन चेस च्या कार्यकारी संचालक मोनिका पानपालिया, अमेरिकेतील टेलसा मोटर्स चे वरिष्ठ संचालक हृषीकेश सागर आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांना सीओईपी अभिमान पूरसाकाराने सन्मानित करण्यात आले. 

भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान मोदींनी सर्वांसमोर ठेवले आहेत. त्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवली पाहिजे , भारतात दरवर्षी २२ लाख कोटी रुपयांचे जीवाष्म इंधन आयात केले जाते. हि अर्थव्यवस्थेतील गंभीर बाब आहे. पर्यावरणपूरक इंधननिर्मितीला येत्या काळात प्राधान्य देण्याची गरज आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रमोद चौधरी, कुलगुरू डॉ.सुनील भिरूड, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गिते, प्रा.सुजीत परदेशी उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती