सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 शहर

भारत विकास परिषद पुणे पूर्व शाखेतर्फे राष्ट्रीय समूह गान आणि भारत को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

डिजिटल पुणे    16-09-2024 17:56:11

पुणे : भारत विकास परिषद, पुणे पूर्व शाखे तर्फे सिम्बायोसिस स्कूल चे ईशान्य सभागृह, विमान नगर येथे 14 सप्टेंबर ला राष्ट्रीय समूहगान आणि भारत को जानो  प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 20 शाळांमधील सुमारे 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.भारताचा गौरवशाली भूतकाळ आणि प्रगतीशील वर्तमान, भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये, याविषयी शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, सामान्य ज्ञाना मधे भर पडावी या उद्देशाने भारत को जानो प्रश्नमंजूषा स्पर्धे चे आयोजन दोन गटांमध्ये करण्यात आली. वर्ग 6 ते 8  कनिष्ठ गट आणि वर्ग 9  ते 12  वरिष्ठ गट. तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत रहावी या उद्देशाने वर्ग  6 ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी व संस्कृत भाषेवर आधारित देशभक्तीपर राष्ट्रीय सामूहगान  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण आणि अरुणा मुथा, विणा हमीने व अपर्णा राजकोंडवार  यांचे द्वारे वंदे मातरम गायनाने झाली.स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भा.वि.प. अध्यक्ष शंकर मुगावे, प्रमुख पाहुणे सेवानिवृत्ति एडमिरल आशीष कुलकर्णी, करनल राड़कर, करनल भट, प्रदीप नाईक या मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. पाहुण्यांचे स्वागत श्री वेंकटेश पत्की, रणजीत नंबिसार, पूनम दोशी, डॉ. देवकिसन बाहेती, माधुरी कोराने यांनी केले. प्रमुख पाहुणे आशीष कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये निश्चितच भाग घ्यावा जेणेकरून स्टेज डेअरिंग व आत्मविश्वास वाढतो व त्याचा फायदा भावी जीवनामध्ये मिळतो असे प्रतिपादन केले. राडकर यांनी विद्यार्थ्यांनी जी तयारी केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि समयोचित मार्गदर्शन केले.

भारत को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धेत, वरिष्ठ गटातून बिशप को एज्युकेशन, ग्यानबा सोपानराव मोझे, एकनाथराव खेसे विद्यालय लोहगाव आणि कनिष्ठ गटातून ढोले पाटील स्कूल, केंद्रीय विद्यालय ए एफ एस, सुंदराबाई मराठे या  शाळांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.सर्वोत्तम वेशभूषा करिता सुंदराबाई मराठे विद्यालयाला देखील पुरस्कृत करण्यात आले .

राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत, भारतीय जैन संघटना विद्यालय प्रथम तर ग्यानबा सोपानराव मोझे विद्यालय द्वितीय आणि सयाजीनाथ महाराज विद्यालय दिघी तृतीय क्रमांकावर राहिली. श्री अजय जोशी, अरुण कोठावळे, श्रीमती प्रीती गांगुली  हे समूहगीत स्पर्धेचे परीक्षक होते. दोन्हीं स्पर्धे मधे प्रथम क्रमांकावर आलेल्या शाळा या प्रांतीय स्तरावर होणार्या स्पर्धेत सहभागी होतील.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती देवकिसन बाहेती व श्रीनिवास चेनशेट्टी यांनी केले.

भा.वि.प. उपाध्यक्ष व्यंकटेश पत्की यांनी स्पर्धा  कार्यक्रमाच्या आयोजनात प्रमुख भूमिका बजावली. डॉ.देवकिसन बाहेती यांनी भारत को जानो स्पर्धेचे नियोजन  व  पूनम जोशी यांनी प्रश्नपेढीच्या तयारीची जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. तसेच वैशाली पत्की, नीता खराडकर, श्री व श्रीमती गडगी, श्वेता उजळमकर, डोग्राजी, ऋषिकेश कद्रे, माधुरी कराने, विश्वास पत्की नी ती सुनियोजित पार पाडण्यास विशेष सहकर्य केले.स्पर्धा आयोजनात भा. वि.प. परिषदेचे  सचिव रणजित नंबिसार विशेष सहकार्य लाभले. सीनियर सिटीजन सुखी नीं सेवा कार्य म्हणून दीर्घकाळ उभे राहून स्पर्धेचे रेकॉर्डिंग व फोटोग्राफी केली. भोजन व्यवस्था पृथ्वी मुथा यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे मध्यांतरि पूर्वी ईशान्य भारताच्या विद्यार्थ्यांनी सुंदर लोकनृत्य प्रस्तुत केले.

कार्यक्रमाची सुनियोजित तयारी, सुंदर आकर्षक परिसर, आलेल्या सर्वांसाठी करण्यात आलेली भोजन व्यवस्था आणि सहभागी विद्यार्थ्यांचे हिंदी व संस्कृत भाषेतील देशभक्तीपर गीतांचे गायन, कला-वेशभूषा आणि भारत को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांची तयारी पाहून  सर्वांना आनंद झाला.भारत विकास परिषद कोषाध्यक्ष रोहिनकर, अनीता ताथे, अरुण हमीने सह  सर्व सदस्य आणि  सिम्बायोसिस स्कूल ईशान्य हाल  चे कर्मचारी वृंद यांच्या सहकार्यामुळेच कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती