सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 शहर

२३ ते २८ सप्टेंबर दरम्यान पर्यावरण व्याख्यानमाला

डिजिटल पुणे    19-09-2024 12:21:56

पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असणारी 'जीविधा' ही संस्था तसेच आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा  बायोडायव्हर्सिटी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे.'स्मॉल इज ब्युटीफुल' या विषयावरील ही व्याख्यानमाला दि.२३ ते २८ सप्टेंबर २०२४ दरम्यान दृकश्राव्य सभागृह,गरवारे महाविद्यालय (कर्वे रस्ता) येथे रोज होणार आहे.व्याख्यानमालेची वेळ रोज सायंकाळी ६.३० ते ८ अशी असणार आहे.व्याख्यानमालेचे १६ वे वर्ष असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.'जीविधा' संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित तसेच गरवारे महाविद्यालयाच्या  बायोडायव्हर्सिटी  विभागाचे प्रमुख डाॅ.अंकुर पटवर्धन यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

डॉ.अंकुर पटवर्धन (छोट्यांचे मोठे कार्य),डॉ.प्रगती अभ्यंकर (सूक्ष्मजीवांचे विश्व), नूतन कर्णिक (सौंदर्य छोट्या किटकांचे), ईशान पहाडे (परागीकरणात किटकांची भूमिका), रजत जोशी( फुलपाखरे),सुधीर सावंत (सूक्ष्मांचे छायाचित्रीकरण) या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. निसर्ग साखळीत सर्व सजीव जातींचे महत्व एकसारखे असते.दुर्दैवाने लहान आकाराच्या सजीवांकडे सजगतेने पाहिले जात नाही.'जीविधा' व गरवारे महाविद्यालयाच्या बायोडायव्हर्सिटी विभागतर्फे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेत छोट्या आकाराच्या जीवसृष्टीची माहिती तज्ज्ञांकडून ऐकण्याची संधी  मिळेल.  

सोबत :वेळापत्रक 

दिनांक : सोमवार, 23 सप्टेंबर 2024

वेळ : सायंकाळी 6.30 ते 8.00

विषय : छोट्यांचे मोठे कार्य

व्याख्याते : डॉ अंकुर पटवर्धन

दिनांक : मंगळवार, 24 सप्टेंबर 2024

वेळ : सायंकाळी 6.30 ते 8.00

विषय : ओळख सुक्ष्मजीव जगताची (Microbes)

व्याख्याते : डॉ प्रगती अभ्यंकर

दिनांक : बुधवार , 25 सप्टेंबर 2024

वेळ : सायंकाळी 6.30 ते 8.00

विषय : सौंदर्य छोट्या कीटकांचे (Miniature Marvels of the Insect World)

व्याख्याते : नुतन कर्णिक

दिनांक : गुरुवार , 26 सप्टेंबर 2024

वेळ : सायंकाळी 6.30 ते 8.00

विषय : परागीकरणात कीटकांची भूमिका (Importance of Pollinators)

व्याख्याते : ईशान पहाडे

दिनांक : शुक्रवार , 27 सप्टेंबर 2024

वेळ : सायंकाळी 6.30 ते 8.00

विषय : चला करूया फुलपाखरांशी ओळख

व्याख्याते : रजत जोशी

दिनांक : शनिवार , 28 सप्टेंबर 2024

वेळ : सायंकाळी 6.30 ते 8.00

विषय : सुक्ष्मांचे छायाचित्रीकरण (Micro Photography)

व्याख्याते : सुधिर सावंत


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती