सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट ! आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर; घटनेत अनेक धक्कादायक खुलासा

डिजिटल पुणे    05-10-2024 13:24:20

कोंढवा :  बोपदेव घाटात रात्राचा फायदा घेत तीन नराधमांनी एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने शहरासह सर्वत्रच मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील तीन आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये एका दुकानासमोर हे तीन आरोपी थांबले असल्याचे दिसत आहे. त्या ठिकाणी तिघांमध्ये काहीतरी बोलणं सुरू असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी घटनेची गांभिर्याने दखल घेऊन पीडित तरुणीने दिलेल्या जबाबावरुन आरोपींचे स्केच रेखाटण्यात आले होते. हे स्केच सोशल मीडीयावर देखील प्रसारित करण्यात आले होते. तसेच आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची विविध पथके देखील रवाना करण्यात आली आहेत.

या घटनेतील पीडित तरुणीने दिलेल्या जबाबाने धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी आरोपींनी पीडित तरुणीच्या मित्राचा खून करण्याची धमकी देत तिला कपडे काढायला प्रवृत्त केले. तसेच तिच्या मित्राला झाडाला बांधले. त्यानंतर आळीपाळीने या नराधमांनी पीडितेवर अत्याचार केला. तसेच यावेळी तिच्या पायाला मारहाण करण्यात आली असल्याचे देखील पीडितेने आपल्या जबाबात म्हटले आहे. यामुळे आता आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याने पोलिसांना आरोपींचा शोध घेणे सोपे झाले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती