सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

मानाजी नगर नऱ्हे येथे एकाला पट्ट्याने मारहाण; यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी

डिजिटल पुणे    10-10-2024 15:37:18

पुणे : सध्या आजकालच्या वातावरणात गुन्हेगारीचे प्रमाण हे प्रचंड वाढत चालले आहे, सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून नागरिकांमध्ये वाद हे सुरूच असतात.  तसेच आता पुण्यातील गुन्हेगारीवर आता अंकुश उरला की नाही? असा प्रश्न ही करू नये अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत. 

 मानाजी नगर नऱ्हे येथे काही जणांनी गंधर्व चौकामध्ये एका नागरिकाला पट्ट्याने मारहाण करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे कारस्थान केल्याचा आणि त्यासाठी अर्धा तास गाड्या रोखून धरून याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे.

 हे सारे होत असताना कोणीही सोडवायचा प्रयत्न  करताना दिसलेले नाही. नागरिकांनी नुसती बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले.मारहाणीचे नेमके कारण काय होते आणि कोण व्यक्तीने हे कृत्य केले, याची चौकशी सुरू आहे. परिसरातील नागरिकांनी यामुळे सुरक्षा आणि शिस्तीच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती