सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 शहर

डॉ.सौ.लता अकलूजकर यांच्या ग्रंथांचे दि.२० रोजी प्रकाशन

डिजिटल पुणे    17-10-2024 13:57:33

पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधिका डॉ.सौ.लता अकलूजकर लिखित 'वराह-श्री विष्णूचा तिसरा अवतार' तसेच 'वीरगळ-एक अभ्यास' या दोन ग्रंथांचे प्रकाशन दि.२० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता मंगल भैरव क्लब हाऊस(नांदेड सिटी, सिंहगड रस्ता) येथे होणार आहे.ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक किशोर चांडक यांच्याहस्ते हे प्रकाशन होणार आहे.मर्वेन टेक्नॉलॉजीज या प्रकाशनाने हे ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

शरद लगड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून एड.नरसिंह लगड,राम बेंद्रे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ऋता कुलकर्णी करणार आहेत.प्रमोद अकलूजकर यांनी  पत्रकाद्वारे ही माहिती दिली.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती