सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 शहर

सौ.गौरी कैलास केंजळे यांना कार्यगौरव पुरस्कार प्रदान

डिजिटल पुणे    18-10-2024 14:37:31

पुणे : बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फलज्योतिष अभ्यास मंडळ तर्फे देण्यात येणारा 'कार्यगौरव पुरस्कार' पुण्यातील गौरी -कैलास ज्योतीष संस्थेच्या संचालक आचार्या सौ.गौरी कैलास केंजळे यांना प्रदान करण्यात आला .ज्योतिष मेळाव्याच्या समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ उद्योजक अशोक चोरडिया ,समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदकुमार कुलकर्णी, नंदकिशोर जकातदार, सतीश जकातदार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात  आlला . कै.पंडित श्रीकृष्ण अनंत जकातदार यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त झालेल्या 'ज्योतिर्विदांचा मेळावा ' मध्ये हे पुरस्कार वितरण बुधवार,१६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडले.
 
आचार्या सौ.गौरी कैलास केंजळे या केपी बेसिक अँड अडव्हान्स, मोबाईल न्युमरॉलॉजी रेमेडिज, मेडिकल न्यूमरॉलोजी, क्रिस्टल विषयाच्या मार्गदर्शक आहेत.गौरी कैलास ज्योतीष संस्थेच्या संचालक आहेत. मोबाईल न्यूमेरॉलॉजी, सुलभ केपी, क्रिस्टल्सच्या अद्भुत दुनियेत, फलादेशाचे तंत्र ( उपयुक्त पायऱ्या) या ग्रंथाच्या त्या लेखिका आहेत.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती