सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 शहर

लोणी काळभोर व मुंढवा पोलिसांची मोठी कारवाई ; इंधन माफिया टोळीचा श्रीकांत उर्फ सोन्या सूंबेला कात्रज मधून अटक

डिजिटल पुणे    18-10-2024 16:19:14

लोणी काळभोर -पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व थेऊर परिसरात गेले दहा ते पंधरा वर्षांपासून इंधन चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रवीण मडीखांबे, त्याचा साथीदार श्रीकांत ऊर्फ सोन्या सुंबे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. मात्र मुंढवा व लोणी काळभोर पोलिसांना सोन्या सुंबेला कात्रज परिसरातून मंगळवारी (ता.१५) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पकडण्यात मोठे यश मिळाले आहे.सुंबेला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी व रिमांड ठोठावले आहे.

इंधन माफिया टोळी प्रमुख प्रविण सिद्राम मडीखांबे (रा.कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे), थेऊर फाटा येथील अड्डा मालक श्रीकांत ऊर्फ सोन्या राजेंद्र सुंबे, तूशांत राजेंद्र सुभे (वय 31, रा. बँक ऑफ बडौदाजवळ, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे), बारामती बस डेपोतील सहाय्यक कारागिर बाबासो माणिक देवकाते (रा. निमगाव केतकी, ता-इंदापूर, जिल्हा पुणे), राहुल गजानन काळभोर (रा. लोणी काळभोर ता. हवेली), रवी छोटेलाल केवट (वय-25, रा. बोरकरवस्ती, माळीमळा, ता. हवेली, जि. पुणे), विशाल सुरेश गोसावी (वय-30 रा. वाणीमला थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे), कृष्णा ऊर्फ किरण हरीभाऊ आंबेकर (वय 31, रा. कदमावाकवस्ती, ता.हवेली, जि. पुणे), रोहीतकुमार छेदु लाल (वय 25 रा. बोरकरवस्ती माळीमळा, ता. हवेली, जि. पुणे), अभिमान ऊर्फ सुभाष सुरेश ओव्हाळ (वय 35 रा. पांढरी रोड, कन्याशाळेच्या मागे, लोणी काळभोर, पुणे), पांडुरंग निळकंठ नकाते (वय 42 रा. माळीमळा, लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे) आकाश सुखदेव घोडके (वय 24, रा. हनुमाननगर, कोथरुड, पुणे), तेजस तुकाराम वाघमारे (वय 23, रा. न्यू शांतीनगर, श्रावणधारा वसाहत, कोथरुड, पुणे) शुभम सुशील भगत (वय 23, रा. बोरकरवस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे), व टैंकर मालक अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या आदेशान्वये लोणी काळभोर व मुंढवा पोलिस हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल-डिझेल चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मंगळवारी (ता. 10 सप्टेंबर) गस्त घालत होते. गस्त घालत असताना, कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाट्याजवळ असलेल्या एका रिकाम्या जागेत पत्र्याच्या शेडजवळ टँकरमथुन इंधन चोरी केली जात आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन इंधन चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले होते.

दरम्यान, टोळी प्रमुख प्रविण सिद्राम मडीखांबे याच्यासह त्याच्या ११ साथीदारांना मोकाची कारवाई करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना या इंधनचोरी प्रकरणात राहुल गजानन काळभोर व बारामती बस डेपोमधील कर्मचारी बाबासो माणिक देवकाते ही दोन नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी दोघानाही अटक केली आहे. तर गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीकांत ऊर्फ सोन्या सुंबे हा फरार झाला होता. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. सदरची कामगिरी हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस हवालदार शिवाजी जाधव व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मल्हारी ढमढेरे,बाजीराव विर यांच्या पथकाने केली आहे.

इंधन माफिया टोळीवर मोकाची कारवाई…

दरम्यान, लोणी काळभोर येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रविण मडीखांबे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. त्याने बेकायदेशीर कृत्य चालु ठेऊन संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संयुक्त गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला आहे. सदर टोळीने मागील १५ वर्षात पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हे पुन्हा पुन्हा केलेले आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या टोळीवर कायद्याचा वचक बसावा म्हणून या टोळीवर या अगोदरच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३/४) या अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

बारामती बस डेपोमधून सहाय्यक कारागिर बाबासो माणिक देवकाते याला इंधनचोरी प्रकरणात सहभागी असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांनी देवकातेला अटक केली आहे. देवकाते हा मागील चार वर्षापासून त्याच पदावर कार्यरत आहे. त्यामुळे लाखो रुपयांची इंधनचोरी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या इंधन चोरी प्रकरणात बस डेपोमधील अजून कोणाचा छुपा पाठींबा आहे का? ते ही पोलिसांच्या तपासात लवकरच निष्पन्न होईल.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती