पुणे : अर्थसिध्दी पतसंस्था पुणे यांनी दीपावलीच्या मुहूर्तावर अर्थसिध्दी अष्टसिध्दी समृध्दी हि योजना आज मा श्री अनिल गाडवे अध्यक्ष दि विश्वेश्वर सहकारी बँक ली यांच्या शुभ हस्ते पडदा उघडून खुली करण्यात आली या प्रसंगी पतसंस्थेचे आधारस्तंभ श्री सुनील रुकारी, पतसंस्थेचे अध्यक्ष श्री भगवान कोठावळे, उपाध्यक्ष श्री श्रीकांत तोडकर, सचिव श्री रवींद्र साळुंखे उपस्थित होते.
या योजनेमध्ये कर्जाच्या दोन योजनांचा समावेश आहे पैकी एक सुवर्ण तारण अर्थात सुधन गोल्ड लोन यात ६% पासून १८% पर्यंत व्याज दर असून रु ३५,००० ते ६२,००० प्रति १० ग्राम वर कर्ज मिळणार व ते सुध्दा दैनंदिन हप्त्यावर देखील फेडण्याची सोय. दुसरी कर्ज योजना व्यावसायिकांसाठी विना तारण २५,००० ते ३,००, लाखापर्यंत व परत फेड १९१ दिवसात अशी व्यवसाय वृध्दी कर्ज योजना आहे
या शिवाय ठेवींच्या ५ योजना आहेत
१) स्वप्नपूर्ती ठेव योजना यात रोज रु १००० भरून ५ वर्षांनी १८.५० लाख रु मिळणार असून दर वर्षी आरोग्य तपासणी होणार आहे
२) ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर १०% व्याज दर
३) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष बचत खाते यावर मिळणार ६% वार्षिक व्याज शिवाय पैसे काढण्यासाठी पतसंस्थेत येण्याची गरज नाही पैसे घरपोच मिळणार
४) अर्थसिध्दी लखपती योजना दर महा ठराविक रक्कम भरून लखपती होण्याची योजना
५) दैनंदिन ठेव आता क्यू आर कोड द्वारा यात दोन महिन्यांनी रक्कम काढली तरी कोणतीही कपात नाही.
या शिवाय ८ वी योजना सहकार बास्केट आहे यात संस्थेचे दुकानदार आपला माल अथवा सेवा सहकार बास्केटच्या पोर्टलवर ठेवणार असून संस्थेच्या सर्व ग्राहकांना ते पाहता येणार आहे या मुले स्वदेशीचा जागर होऊन संस्थेच्या व्यावसायिक ग्राहकांना व्यवसाय मिळेल व घरगुती ग्राहकांना ऑनलाईन खरेदीचा आनंद घेता येणार आहे.
या प्रसंगी बोलताना अनिल गाडवे यांनी संस्थेच्या या योजनांना शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेच्या सन्माननीय ग्राहकांचा प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी योजना समजावून सांगताना संस्थेची आर्थिक आकडेवारी विशद केली ११.५० कोटी रु ठेवी, ८.५० कोटी रु कर्ज व ४.१० कोटीच्या गुंतवणूक असून, ८% ढोबळ एनपीए , ४% निव्वळ एन पी ए , ९% सीआरएआर , ६८% सी डी रेशो सातत्याने अ दर्जा व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडेरेशनकडून २०२३-२४ साठी पश्चिम महाराष्ट्रात १० कोटी गटात प्रथम क्रमांक मिळाला असल्याचे सांगितले.
संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत तोडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शिल्पा कोंढाळकर संचालिका यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, दैनंदिन ठेव प्रतिनिधी, अर्थसिध्दी जागृती महिला मंचच्या सर्व सदस्य उपस्थित होते.