पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत 'कथक नृत्यानुबंध' हे नृत्य सादरीकरण पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.हा कार्यक्रम 'नृत्यवेध कथक नृत्य संस्था' प्रस्तुत करणार आहे.शनिवार,दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृहात होणार आहे.
या कार्यक्रमात डॉ. माधुरी आपटे आणि त्यांच्या नृत्यवेध कथक नृत्य संस्थेच्या विद्यार्थिनी कथक नृत्याचे सादरीकरण करणार आहेत.या कार्यक्रमात कथक नृत्यातील विविधरंगी छटांचे दर्शन असलेल्या वंदना, ताल प्रस्तुती, शाहीर राम जोशी यांची अनवट होरी, मोझार्ट सिम्फनी, अष्टपदी,तराणा या रचना सादर होतील. हा कार्यक्रम विनामूल्य असून भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा २३० वा कार्यक्रम असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.