सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • ४ ॲागष्टला HDFC बॅकेचे UPI पेंमेंट बंद
 शहर

दि.२५ नोव्हेंबर रोजी पुण्यात 'चौरंगी सोहळा-२०२४'; बालगंधर्व परिवार(महाराष्ट्र राज्य),अखिल भारतीय मराठी नाट्य नाटय परिषद(पुणे शाखा) , एमआरबी फाऊंडेशन कडून आयोजन

डिजिटल पुणे    21-11-2024 11:02:22

पुणेः बालगंधर्व परिवार(महाराष्ट्र राज्य), अखिल भारतीय मराठी नाटय परिषद (पुणे शाखा) आणि एमआरबी फाऊंडेशन यांच्या वतीने 'चौरंगी सोहळा-२०२४' या सांस्कृतिक उपक्रमाचे  आयोजन    करण्यात आले आहे.पं.नेहरु सांस्कृतिक सभागृह(घोले रस्ता) येथे   दि.२५ नोव्हेंबर २०२४  रोजी दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत विविध उपक्रम या सोहळ्या अंतर्गत होणार आहेत.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे पुरस्कार प्रदान  कार्यक्रम,बालगंधर्व परिवारच्या वतीने १७ कलाकार माता -पित्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा,आणि कलाक्षेत्राच्या इतिहासात प्रथमच पुरुष आणि महिला बचत गटांचे उद्घाटन -एमआरबी फॉउंडेशन च्या वतीने कलाकार कुटुंब विमा पॉलिसी संदर्भात मार्गदर्शन तसेच दि. २५ नोव्हेंबर या मेघराज राजेभोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अभिष्टचिंतन,असे या चौरंगी सोहळ्याचे स्वरूप आहे.प्रारंभी दुपारी १२ वाजता विनोद धोकटे आणि सहकलाकार संगीत मेहफिल हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती