सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 शहर

उद्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणीः पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण ४६५ फेऱ्या होणार - जिल्हाधिकारी

डिजिटल पुणे    22-11-2024 16:14:17

पुणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण मधील सर्व २१ मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून अंतिम निकाल दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत जाहीर होईल. सर्व २१ मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण ४६५ फेऱ्या होतील. सर्वात जास्त फेऱ्या पुरंदर मतदारसंघात तर सर्वात कमी फेऱ्या आंबेगाव मतदारसंघात होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत दिल

दिवसे म्हणाले, मतमोजणीला शनिवार (दि. २३) सकाळी ८ वाजता सुरूवात होईल. सर्वप्रथम पोस्टल मतदान मोजण्यात येणार असून यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी ३ टीयर पद्धतीची सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. पुणे शहरातील आठ मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. पिंपरी आणि भोसरी मतदारसंघाची मतमोजणी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे होणार आहे. तर उर्वरित मतदारसंघाची मतमोजणी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालयात होणार आहे.

निवडणूक कार्यालयाकडे एकूण २७ हजार ९६२ निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांनी पोस्टल मतदानासाठी अर्ज केला. यापैकी २७ हजार २०५ अर्ज मंजूर झाले. तर २५ हजार १०५ मतदारांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला. पुण्यात ११ हजार ४५८ पोलिसांनी टपाली मतदान केले. निवडणूक कार्य प्रमाणपत्र अदा केलेल्या ६ हजार ९५८ कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ८५ वर्ष वयावरील एकूण १ हजार ८४४ ज्येष्ठ नागरिकांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. तसेच ३१० दिव्यांग मतदारांनी गृहमतदानात सहभाग नोंदवला. सैनिक मतदारांनी ऑनलाईन पद्धतीने ईटीपीबीएमएस म्हणजेच ईमेलद्वारे मतदानाचा हक्क बजावला. आत्तापर्यंत ६२० सैनिक मतदारांनी मतदान केले आहे. सैनिकांना शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मतदान करण्याची मुभा आहे. सर्व मतदारसंघात मिळून ३९१ टेबल्सवर मतमोजणी होणार आहे. यामध्ये ८७ टेबल्सवर पोस्टल मतदान आणि २८ टेबल्सवर ईटीपीबीएस द्वारे आलेल्या मतांची मोजणी होणार आहे.

एकूण मतदारसंघ आणि मतमोजणीच्या फेऱ्या

१) जून्नर : २०

२) खेड-आळंदी : २०

३) शिरूर : २०

४) दौंड : २३

५) इंदापूर : २५

६) बारामती : २०

७) भोर : २४

८) मावळ : २९

९) चिंचवड : २४

१०) पिंपरी : २०

११) भोसरी : २२

१२) वडगावशेरी : २२

१३) कोथरूड : २०

१४) खडकवासला : २५

१५) हडपसर : २२

१६) कसबा पेठ : २०

१७) शिवाजीनगर : २०

१८) पर्वती : २०

१९) पुणे कॅन्टोन्मेंट : २०

२०) आंबेगाव : १९

२१) पुरंदर : ३०


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती