पुणे : लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाची पुणे शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक दि.२८ नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे.पक्षाच्या २४ व्या स्थापना दिवसानिमित्त ही बैठक होणार आहे.दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता साधू वासवानी चौक(पुणे)येथील पक्ष कार्यालयात होईल.लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाचे पुणे शहर-जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.