पुणे : 'हम भारत के लोग ' आणि इनक्रेडिबल समाज सेवक ग्रुप यांच्या वतीने २१ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत संविधान सप्ताह साजरा करण्यात आला. या अंतर्गत निबंध स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, संविधान परिषद आणि संविधान रॅली यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.संविधान अभ्यासक असलम इसाक बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम आयोजित करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे येथील विविध शाळा आणि संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यामध्ये लेडी हलीमा स्कूल, राजीव गांधी स्कूल, पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन संस्था, लेगेसी हायस्कूल, डॉन बास्को इंग्लिश मिडीयम स्कूल, जडाबाई दुग्गड, मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू मिडीयम स्कूल, ज्युपिटर इंग्लिश मिडीयम स्कूल, व्हॅली व्ह्यू इंग्लिश मिडीयम स्कूल आणि फिदा-ए-मिल्लत या शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
याशिवाय, सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला यशस्वी करण्यात मोलाचा हातभार लावला. यावेळी बोलताना असलम इसाक बागवान म्हणाले,' या उपक्रमाचा मुख्य उद्देश घरोघरी संविधान आणि मूलभूत अधिकार पोहोचवणे हा आहे.त्यात सर्वांचा सहभाग मिळाल्याने संविधानातील संदेश सर्वदूर पोचला आहे.'