पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात १७ वे आविष्कार विभागीय स्तरावरील संशोधन स्पर्धा- २०२४ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता वतीने विद्यार्थ्यांसाठी, विभागीय स्तरावर संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत पुणे शहरातील एकूण ७७ महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थ्याने उस्फुर्त सहभाग नोंदवला. विज्ञान शाखेचे 131, कृषी आणि पशुसंवर्धन शाखेचे ७२ आणि इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी शाखेचे २४१ असे एकूण ४२४ संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये एकूण ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यापीठाच्या माध्यमातून यास्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये दडलेला शास्त्रज्ञ व्यक्त होण्यासाठी व समाजाच्या उन्नतीसाठी अशा स्पर्धांचे आयोजन २००६ सालापासून करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व आविष्कार संशोधन समितीचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयक्यूएसीचे संचालक डॉ. संजय ढोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते.
संशोधन मूल्ये रुजवण्यात शिक्षण व्यवस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधनाला प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनात स्वतःला गुंतवून घेण्यास प्रोत्साहित करण्याचे काम आविष्कार स्पर्धेतून होत असून संशोधनातून समाजाला उपयुक्त मूल्ये पुढे यावीत असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व आविष्कार संशोधन समितीचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी केले.
विद्यार्थी आणि तरुण शिक्षकांमध्ये संशोधन संस्कृती रुजवणे, मूळ आणि नवीन विचारांना प्रोत्साहन देणे, शैक्षणिक प्रतिभा अभिव्यक्तीसाठी संधी प्रदान करणे, शैक्षणिक संस्था, संशोधन आणि विकास संस्था आणि उद्योग यांच्यातील परस्परसंवादाला प्रोत्साहन देणे. ही आविष्कार स्पर्धेचे उद्दिष्ट असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयक्यूएसीचे संचालक डॉ. संजय ढोले यांनी सांगितले.
या स्पर्धांचे परीक्षण डॉ. रितेश चौधरी, डॉ. स्मिता पवार, डॉ. फकीर अत्तार, डॉ. स्वाती गोडसे, डॉ. योगेश अनगल, डॉ. अंकश शिर्के, विखे पाटील डॉ. माधुरी बोरावके यांनी केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, आयक्यूएसी प्रमुख डॉ. लतेश निकम इत्यादी उपस्थित होते. शैक्षणिक संशोधन समन्वयक डॉ. सुनीता दानाई यांनी स्पर्धेचे संयोजन केले. सूत्रसंचालन डॉ. किरण रणदिवे यांनी केले तर उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी यांनी आभार मानले.