सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 शहर

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात आपले संविधान यावर व्याख्यानाचे आयोजन

डिजिटल पुणे    02-12-2024 17:43:36

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पौड रोड राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने  संविधान दिनाचे औचित्य साधून  'आपले संविधान' या विषयावर डॉ. नीता बोकील उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख एच. व्ही.देसाई महाविद्यालय यांचे व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या माध्यमातून डॉ. नीता बोकील यांनी संविधानाचा अर्थ, मूल्ये, तत्वे, संविधान निर्मितीची प्रक्रिया, संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
 
 सदर व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. कीर्ती करंजावणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ श्रीनिवास ईपलपल्ली यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. मेघना भोसले, कार्यालय प्रमुख विनोद रणपिसे, डॉ.सुनीता डाकले, डॉ. आदिनाथ पाठक, डॉ. अपर्णा पांडे,प्रा. संतोष मोरे,प्रा.स्नेहा हिंगमिरे, प्रा. नैतिक मोरे, प्रा. सीमा कांबळे उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती