पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा पार पडल्या. रांगोळी स्पर्धेत श्रेया श्रीपाद कुलकर्णी - प्रथम क्रमांक, शिवानी दशरथ डोके- व्दितीय क्रमांक व भाग्यश्री तिमस्य वडार-तृतीय क्रमांक यांनी प्राप्त केला. या स्पर्धेच्या समिती प्रमुख म्हणून सौ. हेमलता धुमाळ यांनी व समिती सदस्य म्हणून सौ. मंजुषा भोसले. सौ. सविता मालुसरे, सौ. नलिनी म्हेत्रे, सौ. गौरी यादव, सौ. विशाखा खांडेकर, सौ. अश्विनी जवळकर, सौ. सीमा शेटे, सौ. राणी फापाळे व सौ. अश्विनी घोरपडे यांनी कामकाज पाहिले.
चित्रकला स्पर्धेत कृष्णा संजय परदेशी-प्रथम क्रमांक, स्नेहल अप्पासाहेब चव्हाण-व्दितीय क्रमांक व अपूर्वा विवेक जुन्नरकर-तृतीय क्रमांक यांनी प्राप्त केला. या स्पर्धेच्या समिती प्रमुख म्हणून सौ. पवार व्ही.एस. यांनी व समिती सदस्य म्हणून सौ. निलम तिवारी, सौ. दिपाली गायकवाड, सौ. सुषमा पाटील, श्रीम. प्रफुल्लता पवार व श्रीम. संगीता चौरे यांनी कामकाज पाहिले.
या स्पर्धेचे उद्घाटन साधना सहकारी बँक लि. संचालक श्रीम. रोहिणी तुपे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, उपप्राचार्य श्री. प्रशांत मुळे, उपप्राचार्य श्री. विलास शिंदे व उपप्राचार्य श्री. अनिल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.