पुणे: भारतात मॉल विकासक कंपन्यांसमोर नवीन आव्हान उभं ठाकलंय.नोव्हेंबर 2024 पर्यंत चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरची कमाई ही 7,811 कोटी रुपयांच्या घरात आहे. तर 2023 मध्ये हाच आकडा 13,161 कोटी रुपये होता.
मुंबई, पुण्यातील मॉल मध्ये एक तरी मल्टीप्लेक्स आहेच. या मॉलमध्ये जाण्याचा उद्देशच हा मनोरंजन, खाणं- पिणं आणि खरेदी असा असायचा. पण 2024 हे वर्ष मल्टीप्लेक्स आणि एकंदरित मॉलसाठी धोक्याची घंटा ठरलं. जसं माणूस जगण्यासाठी परिस्थितीनुसार बदलतो तसंच आता मॉल बांधणाऱ्या आणि त्या कार्यान्वयीत ठेवणाऱ्या कंपन्यांचं झालं आहे. भविष्यात २०२५ मध्ये येणारे मॉल कसे असतील याबद्दल पुण्यातील बांधकाम व्यवसायाची मते.
"या मॉलच्या बदलेल्या समीकरणाकडे आम्ही हा एक तात्पुरता टप्पा म्हणून पाहतो आणि भविष्यात सुद्धा मल्टीप्लेक्सची पडझड दिसणार नाही, मल्टिप्लेक्स हे संपूर्ण कौटुंबिक मनोरंजनाच साधन आहे. मल्टीप्लेक्सचा अनुभव इतर कोणत्याही गोष्टीने बदलला जाऊ शकत नाही. कोणत्याही मॉलच्या यशामध्ये रेस्टॉरंट्स आणि मल्टीप्लेक्सचे योग्य मिश्रण खूप महत्त्वाची भूमिका बजावते."- अजय अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, ब्रम्हाकॉर्प लिमिटेड