पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत 'आदी अष्टकम' या आदि शंकराचार्यांच्या रचनांवर आधारित कथक नृत्य सादरीकरण कार्यक्रम पुण्यात आयोजित केला आहे.हा कार्यक्रम 'नाद रूप',शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था आणि डॉ.उषा आर.के.(मॉस्को ) प्रस्तुत करणार आहेत.रविवार,दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृहात होणार आहे.
वर्षा दासगुप्ता,अस्मिता ठाकूर,मुकेश गंगाणी,अमीरा पाटणकर,अवनी गद्रे हे देशभरातील नामवंत कथक नृत्य कलाकार या सादरीकरणात सहभागी होणार आहेत.हा कार्यक्रम विनामूल्य असून भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा २३२ वा कार्यक्रम असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.