सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

भेदभाव छळ न करता आपल्या मानवी हक्कांसाठी आपण सर्व समान पात्र आहोत - प्रा.कीर्ती करंजवणे

डिजिटल पुणे    10-12-2024 14:33:29

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, युथ रेड क्रॉस युनिट व राज्यशास्त्र विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने १० डिसेंबर २०२४ रोजी अंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कीर्ती करंजवणे, प्राचार्य शर्मिला चौधरी, उप प्राचार्य डॉ मेघना भोसले उपस्थित होत्या.यावेळी प्रा. कीर्ती करंजवणे  यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात त्यांनी मानवी हक्काच्या उत्क्रांतीपासून ते आधुनिक काळातील मानवी घडामोडीचा ऐतिहासिक आढावा घेतला. मानवी हक्क म्हणजे नैसर्गिक हक्क जे माणसाला जन्मजात प्राप्त होतात. मानवी हक्काच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त राष्ट्राने विविध उपाय योजना व अंमलबजावणी यंत्रणा निर्माण केल्या आहेत. ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीचा अधिकार व त्याच्या हक्कांची अंमलबजावणी यावर नियंत्रण ठेवले जाते.मानवी हक्कांची जतन व प्रसार करणे ही काळाची गरज आहे, त्यासाठी स्वहक्क विकासाबरोबर दुसऱ्याच्या हक्काला  बाधा आणू नये.कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा छळ न करता आपल्या मानवी हक्कांसाठी आपण सर्व समान पात्र आहोत. यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 
 
यावेळी प्राचार्य डॉ.शर्मिला चौधरी म्हणाल्या "भारतीय मानवी हक्काच्या सुरक्षितेतेबाबतीत विचार केल्यास असे असे लक्षात येते की, एक पातळीवर मानवी हक्क सुरक्षा यंत्रणा वाढत आहे. मात्र, मानवी हक्क हननाच्या समस्या उग्र होत आहे. वाढती बेकारी, दारिद्र्य शिक्षणाचे खाजगीकरण इ.मुळे भविष्यात भारतीय मानवी हक्क समस्या अधिक उग्र होतील".या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.शर्मिला चौधरी व उप प्राचार्य डॉ मेघना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना  कार्यक्रम अधिकारी डॉ.अशोक शेळके, प्रा.सीमा कांबळे, प्रा.मनीषा खंडाळे, प्रा.गोकुळ सहाने,डॉ.प्रकाश हुंबाड, प्रा.प्रियांका जाधव, प्रा. श्वेता इंदुलकर, विनोद रणपिसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार राठोड व हर्षदा गोरे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार डॉ. श्रीनीवास इपलपल्ली  यांनी मानले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती