सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पुणे पुस्तक महोत्सवाला भेट

डिजिटल पुणे    20-12-2024 17:58:02

पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुस्तक न्यासममार्फत आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी पुणे पुस्तक महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले. श्री. धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीप्रसंगी आयोजित कार्यक्रमास डॉ. डी. वाय. पाटील  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे चेअरमन प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद रावत आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुणे पुस्तक महोत्सवात दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम धर्मेंद्र प्रधान यांनी येथे विविध प्रकाशकांमार्फत लावण्यात आलेल्या पुस्तक स्टॉल्सना भेट दिली. यादरम्यान अनेक  प्रकाशकांनी  श्री. प्रधान यांना त्यांच्यामार्फत पुस्तके भेट स्वरुपात दिली. 

यानंतर येथील व्यासपीठावर आयोजित रंगारंग सोहळ्याने श्री. प्रधान यांचे स्वागत करण्यात आले.  पुढील  टप्प्यात  आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज मलिक यांनी  केले. त्यानंतर मिलिंद सबनीस  लिखित 'कहाणी वंदे मातरम ची' या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुण्याच्या वाचन संस्कृतीचे कौतुक केले. ते म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवास भेट दिल्यानंतर याला मिळणारा प्रतिसाद पाहून अत्यंत आनंद होत आहे. जगाच्या इतिहासाचे समीक्षण करत असताना समाजाच्या निरंतरतेची माहिती पुस्तकांतूनच  मिळते. आई-वडिलांनंतर पुस्तके  हीच आपली निरंतर साथीदार आहेत. 

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी यावेळी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाबाबतही आवर्जून उल्लेख केला व सर्वांचे अभिनंदन केले. भारतीय संविधानामध्ये 22 अनुसूचित भाषा आहेत. मात्र, त्यामध्ये आपल्या मातृभाषेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. लहान मूल जेव्हा दीड-दोन वर्षांचे होते, तेव्हा त्याच्या कानावर  पहिल्यांदा आपली  मातृभाषाच पडते. त्यामुळे पुढील शिक्षण त्याला  मातृभाषेत मिळाले तर त्याचा बौद्धिक  विकास  वेगाने  होण्यात मदत होते. याचा विचार करूनच पंतप्रधान नरेंद्र  मोदी  यांच्या  नेतृत्वाखालील केद्र सरकारने नवीन  शैक्षणिक धोरणामध्ये  मातृभाषेला महत्त्व दिले आहे,  अशी माहिती  केंद्रीय शिक्षणमंत्री  धर्मेंद्र प्रधान यांनी  दिली.

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती