पुणे : बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे या संस्थेचा 25 वा वर्धापनदिन गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी दत्तकृष्ण मंगल कार्यालय वडगाव खुर्द सिंहगड रोड पुणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
1999 साली संस्थेच्या संस्थापक संचालकांनी भावी पिढीसाठी आर्थिक पुंजीची सोय व्हावी या उद्देशाने सुरू केलेली पतसंस्था रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. बेळगाव नागरी सहकारी पतसंस्थेने संस्थेच्या भागधारकांना व्यवसाय, घरबांधणी, वयक्तिक कर्ज, जमीन खरेदी, मुलांचे शिक्षण, लग्न आदी गोष्टींसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्दशाने ही पतसंस्था चालू केली होती.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शहाजीराव रानवडे सेक्रेटरी पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था संचालक, नितीन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था हे उपस्थित होते तर व्याख्याते म्हणून ऍड. के. ई. मांगले माजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तसेच श्री. रामदास सोनाजी शिर्के अध्यक्ष ऑडिट कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन आणि पतसंस्थेचे भागधारक, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमावेळी उपस्थितांचे स्वागत श्री. नारायण रामचंद्र पाटील आणि सुत्रसंचालन एल. डी. पाटील यांनी केले.