सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

रा.से.यो. शिबिरांमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत: डॉ. संगीता जगताप

डिजिटल पुणे    26-12-2024 11:30:45

पुणे : राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिरातून ग्रामीण भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख होत आहे. विद्यार्थ्यांनी आपले आदर्श व्यक्तीमत्व निर्माण व परिपुर्ण व्यक्तीमत्व विकासासाठी शिस्त व श्रम प्रतिष्ठा हे गुण अंगी बाणवत स्वावलंबी बनणे आवश्यक असुन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रम संस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या या गुणात वाढ होण्यास मदत होते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी केले.
 
सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत मुळशी तालुक्यातील मौजे चांदे येथे आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच अशोक ओव्हाळ, पोलिस पाटील हणमंत मांडेकर, ग्रामस्थ राजेंद्र भोगाडे, सुनील पवार, डॉ. राणी भगत, वरिष्ठ लिपिक अनुरीता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
 
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सरपंच मा. अशोक ओव्हाळ यांनी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत सदर विशेष श्रम संस्कार शिबिरासाठी सर्वोपतरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व पोलिस पाटील मा. हणमंत मांडेकर यांनी या विशेष शिबिराबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन करत महाविद्यालयीन जीवनामधील आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले.
 
या उद्घाटन समारंभाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, डॉ. नागेश भंडारी, प्रा. अनुपमा कदम, प्रा. सद्दाम हुसेन घाटवाले, प्रा. ऋषिकेश हिवाळे, प्रा.शैलेश सुरोशे, प्रा. प्रियंका महाजन, प्रा. प्राजक्ता पाटील, वंदना शिंदे, तेजस्विनी नायकवडी, प्रणित पावले, निलेश शिंदे, सचिन शितोळे यांनी परिश्रम घेत


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती