नवी सांगवी : पिंपरी स्पृहाश्री कथ्थक नृत्यालयाच्या वतीने ४० विद्यार्थिनींनी कथ्थक शैलीचे विविध नृत्याविष्कार नवी सांगवी येथे सादर केले. यावेळी संचालिका रेणुका देशपांडे, मोहन बोडे, राजेश बोडे, ऋतुजा सोमण उपस्थित होते. नृत्यावेळी गायन अर्पिता वैशंपायन, संकेत लोहोकरे, अझरुद्दीन शेख, कल्याणी देशपांडे, समीर पुणतांबेकर यांनी साथ दिली.
स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांकडून गौरव
नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या वेळी स्पर्धेतील विजेत्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वेळी मुलांनी कथक नृत्यातील विविध प्रकार सादर केले. सादरीकरणातून मुलांनी टाळ्या वसूल केल्या. तसेच प्रेक्षकांनी कौतुक केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी रेणुका देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कथ्थक नृत्याचे महत्व सांगण्यात आले.