नसरापूर : शंकरराव भेलके महाविद्यालय येथे आर्थिक साक्षरतेबाबत एकदिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( पी डी सी सी ) सहकार्याने केले होते.
कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून देत तरुण पिढीने पैशाचे व्यवस्थापन व गुंतवणुकीच्या संधींबाबत जागरूक राहावे, असे आवाहन केले.
कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. सागर गाडे ( व्यवस्थापक ) यांनी उपस्थितांना आर्थिक नियोजन, बचत, गुंतवणूक आणि डिजिटल व्यवहार यावर सखोल माहिती दिली. तसेच, विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवले.
कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत आर्थिक साक्षरतेसाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. सचिन घाडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. माऊली कोंडे यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.