पुणे : भारतातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या लिबर्टी जनरल इन्शुरन्सला नुकत्याच पार पडलेल्या ईटी नाऊ इन्शुरन्स समिट आणि अवॉर्ड्स 2024 मध्ये "प्रॉम्प्ट इन्शुरर" पुरस्काराने गौरविण्यात आले. लिबर्टीला मिळालेल्या या पुरस्कारातून कंपनीची कार्यक्षमता, सतत सेवा प्रदान करणे त्याचबरोबर ग्राहक-केंद्रित दाव्यांची पुर्ततेसाठी जलद सेवा प्रदान करण्याबाबतची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित झाली आहे. त्याचबरोबर नॉन-लाइफ इन्शुरन्स क्षेत्रातील विश्वासार्ह घटक म्हणून कंपनीचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.
सवोत्कृष्ट कामगिरीसाठी हा सन्मान मिळत असताना, लिबर्टी जनरल इन्शुरन्सने २०२४-२५** या चालू आर्थिक वर्षात मोटार ओन डॅमेज (ओडी) आणि अपघात व आरोग्य (ए अँड एच) या विमा विभागात जोरदार कामगिरी बजावली आहे. मोटार ओडी विभागामध्ये, लिबर्टीने 97.43 टक्के सेटलमेंट रेशो तर 94.18 टक्के इतका क्लेम पेड रेशो नोंदवला आहे. शिवाय, ग्राहकांना तत्काळ सेवा प्रदान करताना कंपनीने 90 टक्के दावे अवघ्या 30 दिवसांत निकाली काढले आहेत. कंपनीने दावापुर्तीशी संबंधित असलेल्या डिस्पोजल रेशोचे प्रमाण 100 टक्के राखले आहे. त्याचबरोबर इन-हाउस क्लेम हाताळणीचे प्रमाण 90 टक्के राखले आहे. विशेष म्हणजे, कंपनीने स्वतःशी जोडलेल्या देशभरातील 5000 पेक्षा जास्त गॅरेजचे कॅशलेस नेटवर्क पॉलिसीधारकांना अतिशय कार्यक्षम सेवा प्रदान करते.
ए अँड एच विभागात, लिबर्टीची कामगिरी प्रामुख्याने कार्यक्षमता आणि ग्राहक-केंद्रित प्रक्रिया यावर आपले लक्ष केंद्रित करते. कंपनीने 96.215 टक्के दावे 30 दिवसात निकाली काढताना 97.39 टक्के* दावापुर्ती गुणोत्तर (सेटलमेंट रेशो) साध्य केले आहे, तर दावापुर्तींतर्गंत निधीवाटप गुणोत्तर (क्लेम्स पेड रेशो) 87.23 टक्के राखले आहे. दावे निकाली काढण्याच्या 100.17 टक्के* गुणोत्तरातून दावे प्रभावीपणे हाताळण्याची कंपनीचा क्षमता ठळकपणे दिसून येते. देशातील 6,300 हून अधिक रुग्णालयांच्या माध्यमातून कंपनीने उभारलेल्या विस्तृत कॅशलेस नेटवर्कमुळे ग्राहकांना आरोग्यसेवेबाबत दर्जेदार पर्याय प्रदान करण्याबाबत लिबर्टीची क्षमता उंचावली आहे.
कंपनीला दर्जेदार कामगिरीबद्दल मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोलताना लिबर्टी जनरल इन्शुरन्सचे सीईओ आणि पूर्णवेळ संचालक श्री. पराग वेद म्हणाले, अतिशय कार्यक्षमतेने त्याचबरोबर पारदर्शक पध्दतीने आमच्या पॉलिसीधारकांच्या दाव्यांच्या निराकरणासाठी आम्ही करत असलेले सखोल प्रयत्न या पुरस्कारातून प्रतिबिंबित होत आहेत. वाहन आणि आरोग्य विमा या दोन्हीमध्ये आम्ही मिळवलेले यश हे सेवेचे वितरण अधिकाधिक सुधारण्याबरोबरच ग्राहकांच्या अपेक्षापुर्तीसाठी आम्ही लक्ष केंद्रित केले असल्याचा भक्कम पुरावा आहे. तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याबरोबरच ग्राहकाभिमुख दृष्टिकोन राबवत आमच्या पॉलिसीधारकांना प्रदान करत असलेल्या मूल्यांची पातळी सतत उंचावण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
कंपनीला विमा सेवांच्या प्रचारासाठी सवोत्कृष्ठ कंटेट मार्केटिंग पध्दतीचा वापर केल्याबद्दल नुकताच Finixx 2024 पुरस्कार देखील मिळालेला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीने अतिशय प्रभावी पध्दतीने ब्रँड व्हिडिओ मोहिम राबविली होती. देशभरातील प्रेक्षकांच्या मनाशी थेट संवाद साधणाऱ्या लिबर्टीच्या सर्जनशील कथाकथनाचा आणि विशेष माहिती सादर करण्याच्या धोरणांचा गौरव या पुरस्कारामुळे झालेला आहे.
कामकाजातील आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याचबरोबर ग्राहकांना विश्वासार्ह सेवा देण्यासाठी लिबर्टी जनरल इन्शुरन्स वचनबद्ध आहे. भारतातील नॉन-लाइफ इन्शुरन्स क्षेत्रातील एक अग्रणी घटक या नात्याने कंपनी आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी नवकल्पना तसेच ग्राहकाभिमुख धोरणांवर आपले लक्ष केंद्रित करत आहे.