पुणे : 'दस्तकारी हाट', या खास वस्त्र प्रदर्शनमध्ये देशभरातील कुशल कारागिरांनी बनवलेल्या साड्या, पोशाख, शाली आणि गालिच्यांचे प्रदर्शन २५ ते ३० डिसेंबर २०२४ रोजी दररोज सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत तेरापंथ भवन, सिटी लाइट्स (सूरत) येथे सुरु असून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या प्रदर्शनामध्ये बनारसी सिल्क, लिनन, कॉटन आणि विशेषत: सण व विवाहांसाठी तयार केलेल्या पारंपरिक पोशाखांचा समावेश आहे. साड्या, ड्रेस, सूट, कुर्ते, शाली आणि हस्तनिर्मित वस्त्रप्रकार हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. हे आयोजन विशेषतः लग्नसराई व सणासुदीसाठी करण्यात आले आहे.या प्रदर्शनामध्ये बनारसी सिल्क साड्या, कुर्ते, बेडशीट्स आणि गालिच्यांसारखे उत्पादन मुख्य आकर्षण ठरत आहे. विविध प्रकारचे वस्त्र एकाच छताखाली खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या एक्सपोमध्ये भारताच्या विविध राज्यांमधून आणलेल्या ५० हून अधिक स्टॉल्सवर सिल्क, कॉटन आणि इतर प्रकारचे कपडे प्रदर्शनासाठी ठेवले आहेत.