सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

घोलप महाविद्यालयामध्ये 'देश का प्रकृती परीक्षण' अभियान

डिजिटल पुणे    28-12-2024 11:17:35

पुणे : भारत सरकारच्या केंद्रीय आयुष  मंत्रालयाच्या वतीने देशातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात नव्यानेच सुरू करण्यात आलेले 'देश का प्रकृती परीक्षण' अभियान नवी सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये आयुर्वेद महाविद्यालय, आकुर्डी यांच्या सहकार्याने विद्यार्थी व शिक्षक यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी डॉ. श्वेता पाटील, डॉ. अमृता इनामदार, समन्वयक प्रा. सद्दाम घाटवाले यांची उपस्थिती होती.
 
या अभियानांतर्गत आयुर्वेद शास्त्राच्या माध्यमातून आयुर्वेद चिकित्सकांकडून १८ ते ७० वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांचे प्रकृती परीक्षण करण्यात येणार असून आकुर्डी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आयुर्वेद महाविद्यालयाच्या माध्यमातून डॉ. श्वेता पाटील, डॉ. प्रशांत टोपले, डॉ. स्नेहल रणझुंजार यांच्या चमूने महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये एकूण ४५० पेक्षा जास्त शिक्षक व विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदवत आपले इ - प्रमाणपत्र प्राप्त केले.या अभियानासाठी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रागिणी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले असून यशस्वीतेसाठी प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा. रुपाली रसाळे, प्रा. प्रीती जोशी, प्रा. गौरी पवार, प्रा. शेखर बुलाखे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती