पुणे : देशभरातील कुशल कारीगारांनी बनवलेले वस्त्र परिधान, साड्या, शाली आणि गालिचे यांचा समावेश असलेले 'दस्तकारी हाट' वस्त्र प्रदर्शन हे दि.१ ते ६ जानेवारी २०२५ दरम्यान काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये बनारसी सिल्क, लिनन, कॉटन आणि सणासुदीच्या विशेष पारंपरिक वस्त्र परिधान यांचे स्टॉल असतील.साड्या, ड्रेस, सूट, कुर्ते, शाली आणि हस्तनिर्मित परिधान सादर केले जातील. हे प्रदर्शन विशेषतः लग्नसराई व सणांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आले आहे.
महत्त्वाचे आकर्षण म्हणजे बनारसी सिल्क साड्या, कुर्ते, बेडशीट आणि गालिचे. या प्रदर्शनात 50 पेक्षा अधिक स्टॉल्सवर भारताच्या विविध राज्यांतील सिल्क, कॉटन आणि इतर पारंपरिक कपडे प्रदर्शित केले जातील.प्रवेश विनामूल्य आहे.