पुणे : 'द ब्लेस्ड वन्स' फाउंडेशन आणि 'पुणे द सिटी' संस्थेच्या वतीने 'द जर्नी ऑफ ड्रीम्स 2.0' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम वीर नारी आणि लहान मुलांच्या क्षमतांचा सन्मान करण्यासाठी १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता रामकृष्ण मोरे सभागृह , चिंचवड येथे होणार आहे.
कर्नल राजीव भारवान (लष्करातील निवृत्त अधिकारी आणि प्रेरणादायी वक्ते), श्री. कार्तिक (सारेगमप फेम गायक), आदित्य तिवारी (राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मुलाचे पालक), आणि अमिताभ वर्मा (सेवानिवृत्त आय ए एस अधिकारी) हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा आगळावेगळा कार्यक्रम विशेष गरजांसह असलेल्या मुलांच्या कौशल्य आणि क्षमतांचे प्रदर्शन करेल. समावेश, स्वीकृती आणि सक्षमीकरण यांना प्रोत्साहन देत, हा कार्यक्रम 'वीर नारी' आणि शारीरिक दुखापतग्रस्तांसाठी मदत निधी उभारण्यासाठी समर्पित केला जाणार आहे.
'द ब्लेस्ड वन्स' फाउंडेशनला केलेल्या देणगीसाठी आयकर कलम 80G अंतर्गत सवलत उपलब्ध आहे. तिकीट आणि प्रायोजकत्वाची माहिती मिळवण्यासाठी
https://theblessedones.in ला भेट द्या किंवा 9867486668 वर संपर्क साधा.