पुणे :'नुपूरनाद अकादमी'च्या वतीने 'नवरुचि' या अरंगेत्रम कार्यक्रमाचे आयोजन रविवार,दि.५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले आहे.वैष्णवी औरसंग,रुचिता वाघमारे,नेहा गवळी यांचा अरंगेत्रम नृत्य आविष्कार या कार्यक्रमात प्रस्तुत केला जाणार आहे.या तिघी सौ.नुपूर दैठणकर-बाग यांच्या शिष्या आहेत.नटूवांगम(गुरु नुपूर दैठणकर),शिवप्रसाद एन.एम.(गायन),मृदंगम(सतीश कृष्णमूर्ती),व्हायोलिन(एस.आर.बालसुब्रमणियम),बासरी(संजय ससिधरन) हे साथसंगत करणार आहेत.खंड,अलारिपू,शिवकीर्तनम,बालमुरलीकृष्णम यांचा तिल्लाना ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये आहेत.प्रमुख राग आणि तालात होणारा शास्त्रीय नृत्य अभिव्यक्तीचा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे.