सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

समाजामध्ये टिकायचे असेल तर वाचन महत्वाचे- डॉ. तुषार शितोळे

डिजिटल पुणे    02-01-2025 16:49:37

पुणे : समाजामध्ये टिकायचे असेल तर वाचन महत्वाचे आहे, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वाचन खूप महत्वाचे आहे. तरुण पिढीमध्ये वाचनाची सवय कमी होत चालली आहे म्हणूनच शासनाने पुढाकार घेऊन "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रम राबविला आहे असे मत  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या अंतर्गत पुस्तक प्रदर्शन व सामूहिक वाचन उपक्रमांवेळी केले. आयोजित पुस्तक प्रदर्शनामध्ये  नावाजलेली पुस्तके, कथा, कादंबऱ्या, चरित्रे, स्पर्धा परीक्षा पुस्तके, अवांतर वाचनाची विविध पुस्तके यांचा समावेश होता.

पुढे त्यांनी सदर उपक्रम अंतर्गत महाविद्यालयात कोणते कोणते उपक्रम घेण्यात येणार आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना देऊन या उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी होण्याचे  तसेच ग्रंथप्रदर्शनातील कोणतेही एक पुस्तक वाचून त्याचे परीक्षण करून महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये जमा करण्याचे आवाहन विदयार्थी तसेच प्राध्यापकांना केले.एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. जगदीश शेवते यांनी " वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रमाची संपूर्ण माहिती सर्व उपस्थितांना करून दिली.

उपक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, प्रा.संदीप लांडगे, सुमित कांबळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. पुस्तक प्रदर्शन व सामूहिक वाचन उपक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्रा. सहदेव रोडे, प्रा.पौर्णिमा कारळे, डॉ.सचिन घाडगे, प्रा.जीवन गायकवाड, प्रा.दयानंद जाधवर,प्रा.माउली कोंडे, प्रा.महेश कोळपे, प्रा.भूषण सामगीर, प्रा,कोमल पोमण, प्रा.ऐश्वर्या धुमाळ, प्रा.अंकिता महांगरे, आशिष परमार, राणी धनावडे इ. उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती