सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या वतीने वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा उपक्रम

डिजिटल पुणे    04-01-2025 15:25:15

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये सहयाद्रीच्या कुशीमध्ये नैसर्गिक सौंदर्याने ओतप्रोत असे नयनरम्य सौदर्यात येथील लोहगड किल्ला भर घालत आहे. देशविदेशातुन अनेक पर्यटक व गिर्याप्रेमी नेहमीच या गडकिल्यांना भेटी देण्यासाठी येत असतात. त्यामुळे मावळाचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गडकिल्यांची स्वच्छता राखणे व त्यांचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य समजुन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पौड रोड पुणे राष्ट्रीय सेवा योजना व युथ रेड क्रॉस युनिट यांच्या वतीने “वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा” हे अभियान राबविण्यात आले.यात विद्यार्थ्यांनी सकाळी नऊ पासून मोहिमेला सुरुवात केली. त्यासाठी चार गट तयार करण्यात आले. दोन गटांनी गडावर व दोन गटांनी प्रवेशद्वारापासून स्वच्छतेला सुरुवात केली.
 
या मोहिमेत ९० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.किल्ल्यावर प्लास्टिक कचरा सर्वाधिक सापडला. बाटल्या, पाणी पाउच, पाण्याच्या बाटल्या एकत्र करण्यात आल्या. यावेळी गोनी मध्ये कचरा जमा करण्यात आला.भिंतीवर खडूने लिहलेला आक्षेपार्ह मजकूर विद्यार्थ्यांनी पुसला.यावेळी भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.शर्मिला चौधरी,उप प्राचार्य डॉ मेघना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना  कार्यक्रम अधिकारी प्रा.संतोष मोरे,डॉ.अशोक शेळके, प्रा.सीमा कांबळे, डॉ.प्रकाश हुंबाड, प्रा.गोकुळ सहाने, प्रा.सोपान गंभिरे, प्रा.प्रियांका जाधव, प्रा. श्वेता इंदुळकर, प्रा.श्वेता मगर, विद्यार्थी प्रतिनिधी कुमार राठोड, कृष्णा फर्ताडे, आविष्कार कोडगे, गीता कटारे, हर्षदा गोरे, मयुरी पांचाळ यांनी केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती