सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

घोलप महाविद्यालयामध्ये 'लेखक आपल्या भेटीला' उपक्रम

डिजिटल पुणे    06-01-2025 13:10:15

पुणे  : वाचन संकल्प महाराष्ट्राचा आणि भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये प्रसिद्ध लेखक डॉ. तानाजी धरणे यांचा 'लेखक आपल्या भेटीला' या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, आयक्युएसी समन्वयक डॉ. अर्जुन डोके, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अनिल लोंढे, मराठी विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा खोडदे, डॉ. विजय बालघरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नागेश भंडारी, प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा. अनुपमा कदम, ग्रंथपाल डॉ. विठ्ठल नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
'लेखक आपल्या भेटीला' या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना प्रसिद्ध लेखक डॉ. तानाजी धरणे यांनी लेखनशैलीच्या विविध वैशिष्ट्ये व पैलूंवर भाष्य करत समाजातील वेदना व संघर्ष आपल्या लेखनातून मांडता आले पाहिजे असे नमूद केले. तसेच आपला लेखनप्रवास उलगडत असताना आपल्या साहित्यातील मैलाचा दगड ठरलेल्या हेलपाटा या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया स्पष्ट करत उपस्थितांना खिळवून ठेवले.
 
आपल्या मनोगतात प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये लेखनाची आवड जोपासत आपले अनुभव लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी विविध विभागातील सुमारे १२० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अतिथी परिचय डॉ. अनिल लोंढे, प्रास्ताविक डॉ. विठ्ठल नाईकवाडी, सूत्रसंचालन डॉ. विजय बालघरे तर आभार प्रदर्शन डॉ. नागेश भंडारी यांनी केले असून प्रणित पावले यांनी विशेष तांत्रिक सहकार्य केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती