सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

'विठूरंग २०२५' या कार्यक्रमाचे १२ जानेवारी रोजी आयोजन

डिजिटल पुणे    06-01-2025 15:45:40

पुणे : 'विठूरंग २०२५' या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन रविवार,दि.१२ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे करण्यात आले आहे.या कार्यक्रमांमध्ये ७० महिला  कलाकार गायन, वादन आणि नृत्याचा विष्कार सादर करणार आहेत .'आकार' संस्था निर्मित हा कार्यक्रम व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी प्रायोजित केला  आहे. 'आकार 'संस्थेच्या वतीने संस्थापक चित्रा देशपांडे,सौ.सुखदा खांडकेकर,अभिनेते अभिजीत खांडकेकर यांनी ही माहिती दिली.प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,सौ.मोनिका मोहोळ,राज्यमंत्री माधुरी सतीश मिसाळ,आमदार सुनील कांबळे,सौ.प्रीती कांबळे,पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील,पूर्णिमा तावरे-बांदल तसेच व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक संतोष बांदल,ज्ञानेश्वर चोरघे,संदीप पवार हे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे.
 
महिलांच्या कलाविष्काराला व्यासपीठ
 
कला,साहित्य,संगीत क्षेत्रातील उपक्रमाना प्रोत्साहन देण्यासाठी 'आकार'संस्थेची स्थापना २०१४ साली झाली.कलाविष्काराला व्यासपीठ मिळाले.'आकार 'संस्थेच्या 'विठू रंग' या कार्यक्रमात  ७० महिला कलाकारांचा समावेश  आहे.त्यात नाशिक,पुणे, पिंपरी चिंचवडमधील महिला सहभागी झाल्या आहेत.महिलांच्या कलाविष्काराला व्यासपीठ देण्याचे विविध उपक्रम संस्थेकडून वर्षभर  केले जातात .'आकार ' संस्थेच्या कला क्षेत्रातील आगामी उपक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी ९८९००३३५२५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती