पुणे : फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचे पर्व संपन्न झाले. ५ जानेवारी २०२५ मॅरेथॉन धावपट्टू व फिटनेस आयकॉन मिलिंद सोमन या कार्यक्रमाचे ब्रँड ॲम्बेसेडर होते. यांच्या सह अभूतपूर्व असा उत्साह अनुभवला. सबंध पंचक्रोशितील धावपट्टूंना एकत्र आणून या कार्यक्रमाने पुण्याच्या क्रिडा जगतात विशेष स्थान मिळविले आहे. पुण्याच्या कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये पराक्रमी धावपट्टूंनी विशेष उल्लेखनीय अशा धावांची नव्याने नोंद केली आहे.
भारताच्या केंद्रभूत स्पर्धा ठरणाऱ्या वार्षिक मॅरेथॉन मध्ये फुल मॅरेथॉन (४२.२ की.मी), हाफ मॅरेथॉन (२१.१ की.मी), १०,००० आणि ५००० फन रन यांच्या समावेश असतो. ज्या माध्यमातून विविध क्षमतेच्या व वयोगटाच्या लोकांचा सामवेश होऊ शकतो.
उत्तम अशा वातावरणात सकाळी ५ वाजता हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे सुरू झाला. पुण्याच्या सांसृतिक व ऐतिहासिक वतनवारसा व शहराच्या मुख्य खुणा स्पष्टपणे निदर्शनात येतील अशा पूर्व नियोजित पटावरून काहीशी आव्हानात्मक तसेच काहीशी गंमतशीर धाव आखण्यात अली होती.
कार्यक्रमाचा चेहरा असलेल्या मिलिंद सोमण यांनी फक्त ब्रँड एम्बेसडर म्हणूनच काम न पाहता खऱ्यार्थाने सर्व वयोगटातील लोकांना शारीरिक स्वास्थ्यासंबंधी प्रेरित केले व स्पर्धकांना देखील काही प्रश्न विचारून उत्साही ठेवले.
तसेच त्यांच्या असण्याने या कार्यक्रमाचा मुख्य हेतू सामूहिक स्वास्थ्य आणि ऐक्टिव लिविंगला याला विशेष अर्थ प्राप्त झाला.
ठळक मुद्दे:
-एकूण स्पर्धक, १६०० हून अधिक
-विविध भारतीय राज्याचे प्रतिनिधीत्व
-विजेते:
४२ की.मी
पुरुष
१८ ते ३४ वयोगट- मनोज कुमार यादव (वेळ-०३:३४:२५)
३५ ते ४४ वयोगट- सागर निंबाळकर (वेळ-०३:३६:४२)
४५ ते ५४ वयोगट- सुधीर (वेळ- ०३:४६:३०)
५५ ते ६४ वयोगट- उदय बोभाटे (वेळ: -३:३१:४५)
स्त्रिया:
१८ ते ३४ वयोगट- इशिता मालविया (वेळ-०४:०८:४९)
३५ ते ४४ वयोगट- दिपाली रहातोळे (वेळ-०४:१४:२२)
२१ की.मी
पुरुष
१८ ते ३४ वयोगट- ईश्वर झिरवळ (वेळ-०१:१०:५५)
३५ ते ४४ वयोगट- योगेश सनप (वेळ-०१:२३:३३)
४५ ते ५४ वयोगट- दात्तारेय जयेभये (वेळ- ०१:२५:३९)
५५ ते ६४ वयोगट- विवेक निरखे (वेळ- ०१:४७:२०)
६५ हून अधिक- बाळासाहेब पवार (वेळ- ०२:१९:५९)
स्त्रिया:
१८ ते ३४ वयोगट- राणी मुचान्नडी (वेळ-०१:२२:५८)
३५ ते ४४ वयोगट- श्वेता खिरज (वेळ-०१:५६:२९)
४५ ते ५४ वयोगट- आरूढती पांडे (वेळ- ०२:२६:३०)
१० की.मी
पुरुष
१८ ते ३४ वयोगट- विशाळ बनसोडे (वेळ- ००:३०:३४)
३५ ते ४४ वयोगट- नरेंद्र पटेल (वेळ-००:४०:५१)
४५ ते ५४ वयोगट- प्रेम कुमार यादव (वेळ- ००:४६:४९)
६५ हून अधिक- अरुण (वेळ- ०१:०६:२१)
स्त्रिया:
१८ ते ३४ वयोगट- सल्लीमुन्सिया अन्सारी (वेळ-००:४६:३२)
३५ ते ४४ वयोगट- ऋतुजा अच्लारे (वेळ-००:५४:५३)
४५ ते ५४ वयोगट- अपर्णा पाय (वेळ- ००:५५:१३)
५५ ते ६४- अशा ओक (०१:०५:४७)
-प्रत्येक २ किलोमीटर च्या अंतरावर सुरक्षा उपकरणे व तत्पर सुविधा.
-सर्व स्पर्धकांसाठी लाईव्ह ट्रैकिंग व्यवस्था.
शारीरिक स्वास्थ्याचे महत्व अधोरेखित करताना या वर्षीचा मॅरेथॉन ने प्लास्टिक मुक्त पाणी पुरवठा केंद्र व सार्वजनिक स्वच्छालय उभाकरून या पर्यावरण सुरक्षेला देखील तितकेच महत्व दिले आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
www.sportstimingsolutions.in
फेडरल बँक (NSE: FEDERALBNK) ही एक आघाडीची भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे ज्याचे सुमारे 1533 बँकिंग आउटलेट्स आणि 2052 एटीएम/रीसायकलर्सचे देशभरात पसरले जाळे आहे आणि बँकेचे एकूण व्यवसाय मिश्रण (ठेवी + ॲडव्हान्स) ₹ 4.99 लाख कोटी आहे ( ही आकडेवारी 30 सप्टेंबर 2024 ची आहे). ३० सप्टेंबर नुसार च्या माहितीनुसार Basel III च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गणना केलेली भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) 15.20% इतके होते. फेडरल बँकेची दुबई आणि अबू धाबी येथे प्रतिनिधी कार्यालये आहेत जी UAE मधील अनिवासी भारतीय ग्राहकांसाठी एक तंत्रिका केंद्र म्हणून काम करतात. बँकेचे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT सिटी) मध्ये IFSC बँकिंग युनिट (IBU) देखील आहे. फेडरल बँक आपली तत्त्वे अबाधित ठेवून, एक अशा संस्थेमध्ये रूपांतरित होते आहे जी समान सेवा देते. येत्या काळामध्ये त्याच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक म्हणून एक सुनियोजीत असे धोरण आहे.